- कै. पं. महादेवशास्त्री जोशी हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. सांगलीच्या पाठशाळेत पंडित ही पदवी मिळवून शास्त्री झालेले महादेवशास्त्री, गोव्यात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून झटणारे समाजसुधारक महादेवशास्त्री, भरपूर उत्पन्न देणारा ज्योतिषीचा व्यवसाय करणे शक्य असूनही त्यामागची भूमिका न पटल्याने तो व्यवसाय न करणारे ज्योतिषी महादेवशास्त्री, भारतीय संस्कृती कोशकार महादेवशास्त्री आणि अखेर पुणे विद्यापीठाची सन्माननीय डॉक्टरेट मिळवूनही तिचा कधीही वापर करणारे महादेवशास्त्री, अशा व्यक्तीचे आत्मचरित्र म्हणजे तो त्या काळाचा इतिहास असतो आणि असे व्यक्तिमत्व कालातीत असते.