- ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून दुसरी नवीन अवस्था धारण करतो त्याप्रमाणे या शरीराचा मालक आत्मा जून झालेला देह टाकून नवीन देह धरण करतो, हे सर्व समजून घेतल्यानंतरही आत्म्याने टाकलेल्या जुन्या शरीराच काय करायच ? हा प्रश्न उरतोच. विज्ञानात मानवाने इतकी प्रगती केलेली असली तरी हा प्रसंग [ मृत्यूचा ] असा असतो की, विज्ञाननिष्ठ माणुससुद्धा अशावेळी अत्यंत भावना विवश झालेला असतो या वेळी अनुभवी वडीलधारी व्यक्ति जवळ उपलब्ध असतेच असे नाही, अशा प्रसंगी व त्यानंतर सुध्हा जे विधी करावयाचे असतात त्यासाठी हे पुस्तक कुटुंबात नक्कीच मार्गदर्शक ठरेल.