Category
Publication
Author
Price Range
PRICE RANGE
Sort By :

Home   >   Ayurved   >   Reference Bks    >    Panchabhautik Chikista Bhag 1
अथातो पांचभौतिक जिज्ञासा
Author(s) :

Publisher(s) : Proficient Publishing House

Category(s)
:

Binding Type :Paper Back

Size :Demi

Pages :172

Edition :2019
   0   Reviews  |  write a Review   |   Tell a friend
Price : 210.00 (Inclusive of all taxes) + FREE Shipping *

Availability :In stock

Quantity :
  • Table of Contents
  • Description
  • Review

-

हे अफाट विश्व ज्याप्रमाणे पंचमहाभूतांपासून बनले आहे, त्याप्रमाणेच मानवी शरीरही पंचमहाभूतांपासून बनले आहे. कोणत्याही व्याधिचे मूळ हे शरीरातील पंचमहाभूतातील तत्त्वांचा समतोल बिघडल्यावर होतो. हे तत्व पांचभौतिक चिकित्सेचे मूळ आहे. त्यामुळे निदान आणि उपचार पांचभौतिक पद्धतीने केल्यास वैद्याला व रुग्णाला व्याधिनिर्मुलन करण्यास दिशा मिळेल.

या विषयावर, वै. प्रशांत सुरु व वैद्या प्रफुल्लता सुरु लिखित, प्रोफिशन्ट पब्लिशिंग हाऊस, पुणे प्रकाशित, अथातो पांचभौतिक जिज्ञासा या पुस्तकाचे प्रकाशन झाले. आयुर्वेदाचे अभ्यासक, वैद्य आणि जिज्ञासू लोकांसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. बृहदत्रयीरत्न वैद्यराज आत्मारामशास्त्री दातार यांनी विकसित केलेल्या पांचभौतिक चिकित्सा पद्धतीविषयी या पुस्तकात लिखाण केले आहे.

लेखकाने आयुष्यातला बराच काळ वैद्यराज दातारशास्त्रींच्या सहवासात व्यतित केला आहे. त्यांच्याकडून ओंजळीनं मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग पुढच्या पिढीला होण्यासाठी हे पुस्तक उत्तम माध्यम आहे. या पुस्तकाचे वैशिष्ठ्य म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला एक  QR Code आहे. तो स्कॅन केला कि आपल्याला त्या प्रकरणाचा गोषवारा ऐकवणारी वैद्य सुरूंच्या आवाजातील ध्वनिफित सुरु होते. याचा उपयोग वाचकाला ते प्रकरण वाचताना नीट आकलन होण्यासाठी होतो. अश्या प्रकारचा प्रयोग आयुर्वेदाच्या वाचकांसाठी पहिल्यांदाच होत आहे.

प्रकाशन प्रसंगी वै. सदानंद सरदेशमुख, डॉ. शं.ना. नवलगुंदकर, डॉ. सुभाष रानडे व डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी आपले विचार मांडले व पुस्तकाविषयी गौरवोद्गार काढले. 

याप्रसंगी वैद्य प्रशांत सुरु व वैद्या प्रफुल्लता सुरु यांनी आयुर्वेदाच्या अभ्यासकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. प्रसार पांचभौतिकाचा प्रचार आयुर्वेदाचा या कार्यशाळेला महाराष्ट्रातून आयुर्वेदाच्या अभ्यासकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

Our Firms : Narendra Prakashan | Proficient Press
© Proficient Publishing House. All rights reserved.